क्रीडाजिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संजीवनच्या दहा मुलींची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

संजीवनच्या दहा मुलींची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

सिंहवाणी ब्युरो / पन्हाळा
रांची (झारखंड) येथे होणाऱ्या 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात संजीवनच्या तब्बल 10 खेळाडूंची निवड झालेली आहे
ही निवड अमरावती व नाशिक येथे झालेल्या स्पर्धेमधून केली गेली असून या दोन्ही वयोगटांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आठ विभागांमधून आठ संघ सहभागी झाले होते

या स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व संजीवन स्कूल करत होते स्कूलने 14 वर्षे व 17 अशा दोन्ही गटांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच अंतिम निवड चाचणीमध्ये 40 मुलींमधून 10 मुलींची निवड महाराष्ट्र राज्याच्या संघात झालेली आहे.

14 वर्षाखालील गटात संजीवनच्या रेवा सोनवणे,श्रेया भाग्यवंत, वंदना सिंग, लिमचिंबी सिंग या चार खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली तर 17 वर्षांखालील गटात संजीवनच्या प्राजक्ता एसारे, आर्या यंबल,कुमकुम सूत्रधार,रीना देवी, केल्विन देवी,रेमो सिंग अशा सहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सदरची निवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन पी. आर. भोसले , सहसचिव एन. आर. भोसले, क्रीडा संचालक सौरभ भोसले यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले असून या खेळाडूंना क्रीडाशिक्षक जयंत कुलकर्णी, सागर पाटील व फुटबॉल प्रशिक्षक अमित साळोखे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button