जिल्हाताज्या घडामोडी

गारगोटी हणबरवाडी येथे “सावधान” च्या फलकावर चार चाकी ठोकरली

गारगोटी हणबरवाडी येथे “सावधान” च्या फलकावर चार चाकी ठोकरली

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
हणबरवाडी एसटी थांब्या नजीक “अपघाती वळण वाहने सावकाश चालवा”च्या फलकालाच एका चारचाकी ने आज दुपारी धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ही गाडी फलकाच्या खांबात घुसली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र गाडीचे नुकसान झाले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पालघाटाकडून गारगोटीकडे येणारी ही इर्टिका हणबरवाडी बस थांब्या जवळ समोर अचानक काही आडवे आल्याने रस्त्यावरून खाली जाऊन फलकाला धडकली. फलका समोर मातीचा ढिगारा असल्याने बऱ्यापैकी वेग कमी झाला आणि अनर्थ टळला.
पालघाटाचा शेवटचा उतार ते आजच्या अपघात स्थळापर्यंत सातत्याने छोटे अपघात होत असतात या परिसरात सायंकाळी अंधार पडण्याच्या सुमारास जंगलात चरण्यासाठी गेलेली गुरे परतत असताना वरून वेगाने येणारी वाहने विशेषतः दुचाकी वाहनधारकांना याचा त्रास होतो. अंधारात गुरे दिसत नाहीत त्यामुळे अनेकदा दुचाकी स्वार पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत संबंधितानी योग्य कारवाई करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button