*उच्च शिक्षण धोक्यात!* *प्राध्यापक भरतीतील 60:40 च्या सुत्राबाबत संदिग्धता कायम : निर्णय अन्यायकारक ठरणार:. 50:50 सूत्राशिवाय भरती नको – इशारा*

**उच्च शिक्षण धोक्यात!*
*प्राध्यापक भरतीतील 60:40 च्या सुत्राबाबत संदिग्धता कायम : निर्णय अन्यायकारक ठरणार:. 50:50 सूत्राशिवाय भरती नको – इशारा*
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर / मुंबई :
राज्य सरकारने प्राध्यापक भरतीसाठी सुचवलेले 60:40 चे नवीन सूत्राबाबत अद्याप संदिग्धता असून पात्रताधारकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाने अजून हा फॉर्म्युला कसा राबविणार ह्याबाबत अजून स्पष्टता केलेली नाही. तसेच हा फॉर्म्युला UGC च्या नियमांना छेद देणारा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया NET/SET, Ph.D. Holder Struggle Committee चे समन्वयक प्रा. जोतीराम सोरटे यांनी व्यक्त केली आहे.
प्रा. सोरटे म्हणाले की, UGC च्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार प्राध्यापक भरती ही 50:50 या न्याय्य सूत्रानुसारच झाली पाहिजे. मात्र सरकारचा सध्याचा प्रस्ताव २०१२ पासून आजतागायत तुटपुंज्या मानधनावर अध्यापन करणाऱ्या NET/SET / Ph.D. पात्र प्राध्यापकांवर अन्याय करणारा आहे.
“गेल्या १५– २० वर्षांपासून नियमित काम करूनही सेवा सुरक्षा नाही, भविष्याची हमी नाही आणि आता भरती प्रक्रियेतूनच बाहेर फेकण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा केवळ उमेदवारांवर नव्हे, तर संपूर्ण उच्च शिक्षण व्यवस्थेवर घाला आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
अनुभव, पात्रता आणि UGC निकष बाजूला ठेवून जर भरती राबवली गेली, तर शिक्षणाच्या गुणवत्तेची अपरिमित हानी होईल, असा इशारा देत प्रा. सोरटे यांनी सरकारने 60:40 चा प्रस्ताव तातडीने रद्द करून 50:50 चे सूत्र लागू करावे, अशी ठाम मागणी केली.
60:40 चा फॉर्म्युला वापरुन ह्या पूर्वीच्या 75:25 च्या फॉर्म्युल्याचे निकष लावल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा स्पष्ट इशाराही दिला आहे.