*सोहोली ( ता कडेगाव ) गावामध्ये दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांचे स्वागत*

*सोहोली ( ता कडेगाव ) गावामध्ये दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांचे स्वागत*
सिंहवाणी ब्युरो / कडेगाव
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलग्न व मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, राजमाची ता. कराड मधील चतुर्थ वर्ष (सत्र- सात) कृषिमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनी ग्रामीण जागृतता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत गावामध्ये कृषी प्रात्यक्षिकांचे सादरिकरण करणार असून यासाठी या विद्यार्थिनी गावामध्ये पाच महिने या कालावधीत शेतकरी बांधव व ग्रामस्थ यांच्या समवेत कृषि ज्ञान व अनुभव प्राप्त करणार आहेत.
प्रात्यक्षिकामध्ये जनावरांचे लसीकरण, शेतीसंबंधी व्याख्याने, कृषी आधारित उपक्रमांचा समावेश असून आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा भाग राहणार आहे. ग्रामीण जागृतता कार्यानुभव कार्यक्रमासाठी सहभागी कृषिकन्या अनिशा बोडरे,ऋषाली माने,ऋतुजा देशमुख
कोमल काळे, गायत्री गावडे,तृषाली गायकवाड आणि धृवाली मदने यांचे स्वागत सरपंच कु. प्रणाली सूर्यवंशी उपसरपंच शहाजी मोहिते तसेच ग्रामपंचायत अधिकारी एस पी माने व ग्रामस्थ यांनी केले.
मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी , उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी व संचालक श्री विलास चौधरी यांचे प्रोत्साहन लाभले असून; कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाने व कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एन. कोळेकर, प्रा. एस. व्ही. देशमुख यांच्या सहकार्याने अद्ययावत कृषि तंत्रज्ञानाची माहिती ग्रामस्थांना या कालावधीमध्ये मिळणार आहे.
फोटो ओळ:
सोहोली ता. कडेगाव येथे कृषिकन्यांचे स्वागत करताना सरपंच कु. प्रणाली सूर्यवंशी ग्रामसेवक एस पी माने आणि इतर मान्यवर.