ताज्या घडामोडीमहाराष्ट्रविशेष

बोरामणीत सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह , मातीत दडलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा ठसा उजेडात… रोमन व्यापारी कनेक्शन आले समोर

बोरामणीत सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह , मातीत दडलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा ठसा उजेडात…

रोमन व्यापारी कनेक्शन आले समोर

सिंहवाणी ब्युरो / महेश गायकवाड, सोलापूर
बोरामणीत सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह आढळून आला आहे, मातीत दडलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन ठसा उजेडात या मधून उजेडात आला आहे.
दगडी चक्र व्युह मधून रोमन प्राचीन रोमन काळातील व्यापारी कनेक्शन समोर आले आहे. रोमन व्यापारी कनेक्शन हे कराड कोल्हापूर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील तेर असे चालत असल्याचे या दगडावरून दिसून येत आहे.
बोरामणीत सापडलेल्या या चक्रव्यूह रचनांनी महाराष्ट्राच्या भूमीखाली दडलेली जागतिक व्यापाराची कथा पुन्हा एकदा जिवंत केली आहे. रोमशी असलेल्या व्यापाराशी हा संबंध या दगडामधून दर्शवतो.
बोरामणीत सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह आढळून आला आहे, मातीत दडलेला दोन हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन ठसा उजेडात आला आहे, या मधून रोमन कनेक्शन समोर आले आहे.

सोलापूर सह महाराष्ट्राच्या भूमीत दडलेला दोन हजार वर्षांचा इतिहास पुन्हा एकदा समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावातील संरक्षित गवताळ प्रदेशात भारतामधील आतापर्यंतची सर्वात मोठी वर्तुळाकार दगडी चक्रव्यूह रचना सापडली आहे. या ऐतिहासिक शोधाने पुरातत्व जगतात खळबळ उडवून दिली आहे.

वर्तुळाकार दगडी रचना ही सर्किटची भव्य रचना आहे.
पुणे येथील डेक्कन कॉलेजचे पुरातत्वशास्त्र अभ्यासक सचिन पाटील यांनी या शोधास दुजोरा दिला आहे. तब्बल 50 फूट बाय 50 फूट व्यासाची आणि 15 सर्किट असलेली ही वर्तुळाकार दगडी रचना भारतात आजवर सापडलेली सर्वात मोठी चक्रव्यूह रचना ठरली आहे. याआधी भारतात नोंदवलेल्या वर्तुळाकार चक्रव्यूहांमध्ये जास्तीत जास्त 11 सर्किटचीच रचना आढळली होती.
लहान दगडी गोट्यांत दडलेला इतिहास
ही चक्रव्यूह रचना लहान दगडी गोट्यांपासून तयार करण्यात आली असून, तिच्या कड्यांमध्ये मातीचा स्वतंत्र थर आढळतो. हा थर आजूबाजूच्या जमिनीपेक्षा सुमारे 1 ते 1.5 इंच उंच असल्याने, ही रचना शतकानुशतके कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय अबाधित राहिल्याचे स्पष्ट होते. रोमन नाण्यांवरील चक्रव्यूहाशी साधर्म्य
पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील यांच्या मते, ही रचना पहिल्या ते तिसऱ्या शतकातील रोमन नाण्यांवर आढळणाऱ्या चक्रव्यूहाशी साधर्म्य राखते. त्यामुळे सातवाहन काळात पश्चिम किनाऱ्यावरून अंतर्गत भागात प्रवास करणाऱ्या रोमन व्यापाऱ्यांसाठी ही चक्रव्यूह रचना ‘नेव्हिगेशनल मार्कर’ म्हणून वापरली जात असावी. या शोधामुळे धाराशिवमधील तेर आणि रोमन साम्राज्य यांच्यातील प्राचीन व्यापारी संबंधांवर नवा प्रकाश पडला आहे.

निसर्गप्रेमींच्या नजरेतून इतिहासाचा शोध
बोरामणी गवताळ सफारी अभयारण्यात पाहणी करत असताना नेचर कन्झर्वेशन सर्कल, सोलापूरच्या सदस्यांना ही रचना प्रथम दिसून आली. पप्पू जमादार, नितीन अन्वेकर, धनंजय काकडे, भरत छेडा, आदित्य झिंगाडे आणि सचिन सावंत यांच्या पथकाने पुरातत्वीय महत्त्व ओळखून त्वरित तज्ज्ञांशी संपर्क साधला.

कोडे ते ‘यमद्वार, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अर्थ
स्थानिक भाषेत या चक्रव्यूहांना ‘कोडे’ म्हटले जाते. विविध संस्कृतींमध्ये त्यांना चक्रव्यूह, मनचक्र, यमद्वार अशी नावे आहेत. नेव्हिगेशनशिवाय या रचना ध्यान, मातृसत्ताक प्रजनन शक्ती आणि आध्यात्मिक साधनेशी जोडल्या गेल्याचेही अभ्यासक सांगतात.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
लंडनस्थित प्रसिद्ध चक्रव्यूह संशोधक जेफ सावर्ड यांनी या शोधाला अत्यंत महत्त्वपूर्ण ठरवले आहे. हा शोध यूकेमधील ‘कॅरड्रोइया’ या आंतरराष्ट्रीय जर्नलच्या 2026 च्या आवृत्तीत सविस्तर प्रसिद्ध केला जाणार आहे.
महाराष्ट्राच्या मातीत दडलेली जागतिक कथा आहे
डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक पी. डी. साबळे यांच्या मते, कोल्हापूर, कराड, तेर आणि सोलापूरचा हा संपूर्ण पट्टा प्राचीन काळात ग्रेको-रोमन व्यापाऱ्यांचा गजबजलेला व्यापार मार्ग होता. या चक्रव्यूह रचनांनी महाराष्ट्राच्या भूमीखाली दडलेली जागतिक व्यापाराची कथा पुन्हा एकदा जिवंत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button