हेरे येथे अँग्रो टुरीझम साकारणार: ॲड. आप्पासाहेब देसाई :

हेरे येथे अँग्रो टुरीझम साकारणार: ॲड. आप्पासाहेब देसाई :
सिंहवाणी ब्युरो / चंदगड
हेरे ( ता. चंदगड) येथे तलावानजीक ॲग्रो टुरीझम प्रकल्प साकारण्यात येणार असून तिलारी- किल्ले पारगड- आंबोली या पर्यटनाच्या ट्रॅगल द्वारे हेरे अँग्रो टुरीझम चंदगडच्या पर्यटनाला चालना मिळू शकेल असा विश्वास ॲड. आप्पासाहेब देसाई यांनी व्यक्त केला. हेरे अँग्रो टुरीझम प्रकल्प येत्या उन्हाळा हंगामात सुरु करण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरु आहे. या ॲग्रो टुरीझम प्रकल्पाकडे देश, विदेशातील पर्यटक आकर्षित होतील. ८० एकरहून अधिक क्षेत्रात अँग्रो टुरिझम प्रकल्प साकारण्यात येईल. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून जाणार आहे. आंबोली- तिलारी -हेरे – किल्ले पारगड असा नवा पर्यटनाचा त्रिकोण तयार होणार आहे. असेही ॲड. देसाई यांनी स्पष्ट केले.
हेरे- चंदगड येथे
मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आप्पासाहेब देसाई( लिंगनूरकर) यांच्या पत्नी सौ. उर्मिलादेवी देसाई यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्य अभिष्टचिंतन करून सिंहवाणी लाईव्ह न्यूज यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सिंहवाणीचे गडहिंग्लज विभागीय प्रतिनिधी प्रा. डॉ. सुनील देसाई; निवृत्त जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी आनंदराव शिंदे. या कार्यक्रमात राहुल बजरंग देसाई( गारगोटी) संग्रामसिंह देसाई- कुपेकर, रामराजे देसाई- कुपेकर, किशोर देसाई ( कानडेवाडी) ॲड. अमित देसाई, गोड साखरचे व्हा. चेअरमन प्रकाश चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.