आरोग्य व शिक्षणजिल्हाताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नक्कीच निर्माण व्हावा – इस्त्रो अभियंता कपिल सुतार : निपाणी परिसरात विज्ञानवारी उपक्रम

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नक्कीच निर्माण व्हावा – इस्त्रो अभियंता कपिल सुतार

निपाणी परिसरात विज्ञानवारी उपक्रम


सिंहवाणी ब्युरो / निपाणी
प्राथमिक स्तरावरच विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या संकल्पना प्रयोगाच्या माध्यमातून समजावून देऊन, त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सुरू असलेला शनिवारी विज्ञानवारी हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उपक्रम मराठी विज्ञान परिषद निपाणी विभागाकडून राबवला जात आहे. हे खूपच अभिनंदनीय असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नक्कीच निर्माण होईल असे मत इस्त्रो बेंगलोर येथील अभियंता शास्त्रज्ञ कपिल सुतार यांनी व्यक्त केले.
ते मध्यवर्ती मराठी विज्ञान परिषद, मुंबई.ने , प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या अर्थसहाय्यातून मविपच्या विविध विभागाद्वारे सुरू केलेला हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपक्रम देशासाठी शालेय पातळीवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मूलभूत पाया घालणारा आहे .असे गौरवोद्गार काढले.

मराठी विज्ञान परिषद निपाणी विभागाच्या संशोधक शास्त्रज्ञ आपल्या विद्यालयात या उपक्रमांतर्गत ते मविप निपाणी विभागाच्या वतीने शनिवारी विज्ञानवारी उपक्रमातील सहभागी शाळेला प्रयोग संचाचे वितरणासाठी आले असताना बोलत होते.
यावेळी हायस्कूलमध्ये विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शास्त्रज्ञ कपिल सुतार यांच्या हस्ते करण्यात आला.
यासाठीचा इस्रोचे अभियंता वैज्ञानिक कपिल सुतार यांच्या सत्काराचा मुख्य कार्यक्रम सरकारी मराठी हायस्कूल यमगर्णी, येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक अरविंद कांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला शांतता पुरस्कार 2025 विजेते डॉ.शिवानंद कुंभार  लाभले होते.
यावेळी इस्त्रोचे शास्त्रज्ञ कपिल सुतार यांचा सत्कार नेल्सन मंडेला पुरस्कार विजेते डॉक्टर शिवानंद कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला. तर पहिला आंतरराष्ट्रीय शांत नेल्सन मंडेला शांतता पुरस्कार – 2025 मिळाल्याबद्दल डॉ.शिवानंद कुंभार यांचा सत्कार हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री अरविंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पुरस्काराच्या संदर्भात बोलताना डॉ. शिवानंद कुंभार यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून माझ्या टीमच्या माध्यमातून सुमारे पाच हजार पेक्षा जास्त मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळात दीड लाखापेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधक कीडचे वितरण कर्नाटक राज्य व महाराष्ट्र राज्यामध्ये केले आहे. त्याचप्रमाणे गरीब निराधार विद्यार्थ्यांना अर्थसाह्य ही केले आहे. या सर्व बाबींचा विचार पुरस्कारासाठी करण्यात आला होता. असे सांगितले. आणि सत्कार याबद्दल कृतज्ञता ही व्यक्त केली. अध्यक्षपदावरून बोलताना अरविंद कांबळे यांनी सांगितले की, जगातील आघाडीच्या असलेल्या इस्रो संस्थेत काम करणारे अभियंता शास्त्रज्ञ श्री कपिल सुतार सर यांनी आमच्या शाळेला भेट देऊन मार्गदर्शन करावे, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कीर्तीचा नेल्सन मंडेला पुरस्कार मिळवणारे डॉ. शिवानंद कुंभार सर यानीही मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे. हा योग आमच्या शाळेला सातत्याने मार्गदर्शन करणाऱ्या मराठी विज्ञान परिषद निपाणी विभागाने घडवून आणला आहे .विभागाचे मनःपूर्वक आभार .मविप निपाणी विभागाकडून असेच मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी शनिवारी विज्ञानवारी प्रयोग संच इस्त्रोचे शास्त्रज्ञ कपिल सुतार व युवा विज्ञान प्रसारक कु. सोनाली पाटील हिच्या हस्ते नंदू कांबळे मुख्याध्यापक सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा,यमगर्णी यांच्या कडे देण्यात आला. तसेच इस्त्रो शास्त्रज्ञ कपिल सुतार व कु. पियुशा माळुंगे व कु. शशिकला मातीवड्डर यांच्या हस्ते शनिवारी विज्ञान वरी प्रयोग संचाचे वितरण सरकारी उच्च प्राथमिक शाळा नाजूक नगर कोडणी नं.१ यांच्या मुख्याध्यापक सौ पाटील यांना देण्यात आला, तर सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा,नवे ममदापूर येथे इस्रोचे शास्त्रज्ञ कपिल सुतार यांचे सह युवा विज्ञान प्रसारक कु. पूर्वा केनवडे,कु. साक्षी खोत, यांचे सह कु. अनुराधा उत्तुरे व कु. प्रणाली आवटे यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्रीअनंत मोरे यांच्याकडे प्रयोग संचाचे वितरण करण्यात आले. वरील सर्व शाळांना इस्त्रोचे वैज्ञानिक कपिल सुतार व या कार्यक्रमाचे समन्वयक बाबासाहेब मगदूम यांनी प्रत्यक्ष यमगर्णी, कोडणी व ममदापूर येथील शाळेतजाऊन प्रयोग संचाचे वितरण केले आहे.
प्रारंभी यमगरनी हायस्कूल मध्ये झालेल्या कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत ,प्रास्ताविक व सूत्रसंचालन के.एव.कोणे यांनी केले. पाहुण्यांची ओळख व मराठी विज्ञान परिषदेच्या उपक्रमाविषयी एस के दिवटे यांनी सांगितले. तर आभार विज्ञान शिक्षिका प्रणिती पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास उद्योजक चव्हाण, परिषदेचे कार्यवाह आणि संशोधक आपल्या विद्यालयात या उपक्रमाचे समन्वयक बाबासाहेब मगदूम, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button